Uttar Pradesh ATS notice to 14 persons in Chhatrapati Sambhajinagar Saam TV
महाराष्ट्र

Breaking News: छत्रपती संभाजीनगरमधील १४ जणांना उत्तर प्रदेश एटीएसची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Sambhajinagar ATS News: छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील १४ जणांना उत्तरप्रदेश एटीएसने नोटीस बजावली आहे.

Satish Daud

Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील १४ जणांना उत्तरप्रदेश एटीएसने नोटीस बजावली आहे. १५ ते १८ जानेवारीदरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देखील या नोटीसीत देण्यात आल्या आहेत. एटीएसचे उपअधीक्षक कुलदीप तिवारी यांची या नोटीसीवर स्वाक्षरी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात सप्टेंबर महिन्यात एका संघटनेची गुप्त बैठक झाली होती. या बैठकीत अयोध्येमधील धार्मिक स्थळांबाबत चर्चा झाल्याचा पोलिसांना संशय होता.

या बैठकीत सदर कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे तांत्रिक पुरावे तेलंगणा पोलिसांना प्राप्त झाले. पोलिसांनी (Police) तत्काळ हे पुरावे उत्तर प्रदेश एटीएसला पाठवले होते. यानंतर उत्तर प्रदेश एसटीएसने ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर युपी एटीएस पथक शहरात तपासासाठी आले होते. त्यांनी संशयितांची चौकशी देखील केली होती. दरम्यान, चौकशीनंतर आता एटीएसने १४ जणांना नोटीस पाठवली असून १५ ते १८ जानेवारीदरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील १४ जणांना उत्तर प्रदेश एटीएसची नोटीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT