Usmanabad News Saam tv
महाराष्ट्र

Usmanabad News: वाहनावर लावला अंबर दिवा; तहसीलदारांना ठोठावला दंड

वाहनावर लावला अंबर दिवा; तहसीलदारांना ठोठावला दंड

माधव सावरगावे

उस्‍मानाबाद : शासकीय वाहनांवर अंबर दिवा बसविण्यास मनाई आहे. असे असतानाही उस्मानाबादच्या तहसीलदारांनी वाहनावर अंबर दिवा लावला. यामुळे वाहतूक शाखा अधिकाऱ्याने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तहसीलदारांना ५०० रुपयांचा दंड केला आहे. (Tajya Batmya)

प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाहनावर अंबर दिवे लावण्यास मनाई आहे. असे असतानाही उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी गाडीवर अंबर दिवा लावून फिरत असल्याची माहिती नागरिकांनी वाहतूक शाखेस कळविली होती. वाहनाचे फोटोही पाठविले. या माहितीची खातरजमा करून वाहतूक अधिकाऱ्यांनी (Traffic Police) वाहनाची पाहणी केली.

पाचशे रूपयांची फाडली पावती

वाहनाची पाहणी केली त्‍यावेळी वाहनावर अंबर दिवा नव्हता. मात्र, गाडीवर दिवा असलेला फोटो होता. वाहतूक शाखेकडे असलेल्या मशीनवर अंबर दिव्यासंदर्भात कारवाई करण्याची तरतूद नाही. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर पावती फाडून वाहतूक शाखेने ५०० रुपये दंड वसूल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT