Maharashtra CM Eknath Shinde News Saam TV
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; कशी असेल शिंदे सरकारची रणनीती?

मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी ही बैठक बोलावली असावी असाही अंदाज वर्तवला जात आहे.

सुरज सावंत

CM Eknath Shinde Delhi Visit : राज्यात २७ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (२६ फेब्रुवारी) दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दैऱ्यावर रवाना होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि प्रमुख नेत्यांची तातडीने एक बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत कोणत्या मुद्द्यावंर चर्चा होणार यावर चर्चा सुरू आहे. (Latest CM Eknath Shinde News)

अर्थसंकल्पिय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना मंत्री,महत्वाचे आमदार व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकिय निवासस्थानी वर्षावर ही बैठक दुपारी २ च्या सुमारास होणार आहे. दिल्लीत मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

अर्थसंकल्प अधिवेशनात महत्वाची विकास कामे त्याचबरोबर विरोधकांना प्रतिउत्तर देण्याबाबत व्यूह रचना या बैठकीत आखली जाणार असं म्हटलं जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांचे प्रश्न आणि त्यावर प्रत्युत्तर अशा सर्वच मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.

आज सायंकाळी ६.३० च्या सुमार मुख्यमंत्री दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. तातडीच्या बैठकीप्रमाणेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा महत्वाचा आणि मंत्रीमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे.

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा?

पक्षाचे 'चिन्ह' आणि 'नाव' मिळाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी मार्ग देखील मोकळा झाला आहे. त्यामुळे याबाबत चर्चेसाठी ही बैठक बोलावली असावी असाही अंदाज वर्तवला जात आहे. अवघ्या काही तासांसाठी मुख्यमंत्री दिल्ली दौरा आणि त्याआधी 'वर्षा'मधील बैठक यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT