Maharashtra Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा कहर सुरूच; पुण्यासह नंदुरबार, नाशिकमध्ये जोरदार पाऊस

Maharashtra Weather : राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लागली आहे. यात पुणे जिल्ह्यासह नाशिक, नंदुरबार, जळगाव, जालना, धाराशिव जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे

Rajesh Sonwane

Maharashtra Rain Update : साधारण मागील आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. आज देखील राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लागली आहे. यात पुणे जिल्ह्यासह नाशिक, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, जालना, धाराशिव जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तर येत्या आठवड्यात देखील पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. 

आठवड्याभरापासून सातपुड्यात तुफान पाऊस 

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून तुफान पाऊस होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाचा कहर पाहण्यास मिळाला. तर अवकाळी पावसामुळे भर उन्हाळ्यात सातपुड्यातील नद्यांना पूर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. आज अचानक आलेल्या पावसामुळे बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. तर सलगच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून केळी, पपईसह आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह पुन्हा पाऊस 

नाशिक जिल्ह्यात देखील सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. यातच आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. तर अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

येडशी, येरमाळा भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस
धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील येडशी, येरमाळा, भूम आणि धाराशिव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या अवकाळी पावसामुळे उष्णता कमी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या आंबा, डाळिंब आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

इंदापूरमध्ये अवकाळी पावसाच्या सरी
राज्यात सर्वदूर पाऊस होत असताना पुण्याच्या इंदापूरमध्ये देखील मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे इंदापूर शहराच्या बाह्यवळणावर महात्मा फुले चौकात पुणे- सोलापूर महामार्गावर पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहेत. या पाण्याच्या डबक्यातून वाहन चालकांना मार्ग काढीत प्रवास करावा लागतोय. तसेच शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

जालना जिल्ह्यात येलो अलर्ट
जालना जिल्ह्यातल्या राजुरसह परिसरातील तुपेवाडी, तपोवन, वसंतनगर, चनेगाव यासह आसपासच्या परिसरात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाकडून आज जालना जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून पुढील चार दिवस पावसाचे राहणार असल्यासही हवामान विभागाने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT