7780 Hectares Crops Got Damaged Due To Unseasonal Rains In Washim Saam Digital
महाराष्ट्र

Washim Weather: अवकाळी पावसाचा शेतक-यांना फटका, वाशिम जिल्ह्यात 7 हजार 780 हेक्टर पिकांचे नुकसान

Washim Rain News: मागील तीन ते चार दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातील विविध भागात अधून मधून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे उकड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतीचे मात्र नुकसान झाले आहे.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मागील तीन महिन्यांत वाशिम जिल्ह्यात ७ हजार ७८० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या अवकाळी पावसाने वारंवार पिकांचे नुकसान होऊन शेतकरी हतबल झाला आहे.

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव व मानोरा तालुक्यात रविवारी देखील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मागील तीन ते चार दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातील विविध भागात अधून मधून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे उकड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतीचे मात्र नुकसान झाले आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यात झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामेही पूर्ण झाले आहेत. बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी आवश्यक निधीबाबतचा अहवाल विभागस्तरावर जिल्हा प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT