Unseasonal Rain Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Unseasonal Rain: राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा; पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणे नुकसान

Unseasonal Rain Farmers News: शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

Shivani Tichkule

सुशिल थोरात

Ahmednagar Unseasonal Rain : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक पिकांचे नुकसान झालेय यात प्रामुख्याने उन्हाळी हंगामात घेण्यात येणारे कलिंगड, खरबूज, टोमॅटो, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.  (Latest Marathi News)

पारनेर (Parner) तालुक्यातील खडकवाडी, पळशी या भागात गारपीट आणि अति मुसळधार पाऊस (Rain) झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वनकुटे गावातील शेतकरी भीमराव पायमोडे यांनी तीन एकर कांद्याची लागवड केली होती. कांदा काढण्यासाठी आलेला असताना रात्री झालेल्या अतिवृष्टीने भुईसपाट झाला आहे त्यामुळे त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.

रात्री झालेल्या वादळी वारा आणि अतिवृष्टीने या भागातील घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास सात ते आठ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिक रस्त्यावर आले आहेत. सोसाट्याचा वाऱ्यामुळे घरावरील पत्रे अक्षरशः पत्त्यासारखी उडत होती.

मात्र जीव मुठीत घेऊन महिला, मुलं आणि पुरुष मंडळी एका कोपऱ्यात बसून होते. दैवबलवत्तर म्हणून जीव वाचला आशा भावना महिलांनी व्यक्त केल्या. तर काही नागरिक देखील जखमी झाले आहेत. तसेच गाई म्हशी आणि शेळ्या ह्या देखील मोठ्या प्रमाणात जखमी झाल्या आहेत.

आज पहाटे सहा वाजल्यापासूनच पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी या भागाची पाहणी करून शासकीय अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सरकारने आता पंचनामे न करता तातडीने मदत करावी अशी मागणी आमदार लंके यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जगाची धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार; होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेने इराणची ३१ जहाजे रोखली

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दरम्यान राडा; मुर्शिदाबादमध्ये हुमायूं कबीर यांच्या विरोधात घोषणाबाजी

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकमधील प्रसिद्ध डॉक्टरचं नाव समोर; गर्भपातासाठी करायचा मदत

Coconut Water Vs Cucumber Water: नारळ पाणी की काकडीचे पाणी? उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी कोणतं ड्रिंक बेस्ट?

Ready To Wear Blouse Designs : शिलाईचे झंझट नको गं बाई! उन्हाळ्यात साडीवर स्टाइल करा 'हे' ५ रेडी-टू-वेअर ब्लाउज

SCROLL FOR NEXT