Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : अवकाळी पावसाचा हाहाकार; पुणे- सोलापूर महामार्गावर कार गेली वाहून, बारामतीत नीरा डावा कालवा फुटला

Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज दुपारी बारामती, पुणे, हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली

Rajesh Sonwane

राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकार अजूनही सुरूच आहे. आज दुपारच्या सुमारास देखील राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दुपारी बारामती, पुणे, हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पुणे- सोलापूर महामार्गावरील कार गेली वाहून
दौंड
: गेल्या चार दिवसांपासून दौंड तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे. आज दुपारी झालेल्या पावसामुळे पुणे- सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. दरम्यान पावसाच्या हाहाकाराने पुणे- सोलापूर महामार्गावरील एक इनोवा वाहून गेली. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. 

हिंगोलीत रस्ता गेला वाहून

हिंगोली : मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने पावसाने हाहाकार उडाला आहे. हिंगोलीत अनेक नद्या नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत. तर हिंगोलीच्या जवळा पळशी ते नरसी मार्गावर असलेला पर्यायी रस्ता पावसामुळे वाहून गेला आहे. या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुल बांधणीचे काम सुरू आहे. हे काम अपूर्ण असल्याने प्रशासनाने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी रस्ता निर्मिती केला होता. मात्र हा रस्ता पावसाच्या पाण्यात पूर्णपणे वाहून गेल्याने नागरिकांसह संत नामदेवांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. 

इंदापूरच्या भिगवणमध्ये पावसाचा कहर
गेल्या चार- पाच दिवसापासून पुण्याच्या इंदापूर तालुक्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. इंदापुरातील महत्त्वाचे असणाऱ्या भिगवण बसस्थानकाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं त्याला तळ्याच स्वरूप आले आहे. भिगवन बसस्थानकातून बारामती- अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र या ठिकाणचा परिसर पाण्याखाली गेल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

बारामतीत नीरा डावा कालवा फुटला..
बारामती
: बारामती तालुक्यातील निरा डावा कालवा पाण्याच्या वेगामुळे फूटला असून हजारो लिटर पाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर येऊन रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी निरा डावा कालवा फुटला असून शेतकऱ्यांच्या शेतात घरामध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. काटेवाडी भवानीनगर हा रस्ता तूर्तास बंद करण्यात आला आहे.

माळशिरस तालुक्यात मुसळधार पाऊस
माळशिरस तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे ओढे, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात ही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे रेडे गावातील ओढा ओव्हरफ्लो झाला आहे. येथील बंधारा तुडुंब भरला असून पाणी वाहू लागले आहे. येथील जुना पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे रेडे परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT