पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं दुचाकीसह दोघे गेले वाहून  विनोद जिरे
महाराष्ट्र

पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं दुचाकीसह दोघे गेले वाहून

एकाचा मृतदेह सापडला तर एक बेपत्ता

विनोद जिरे

बीड - धारूर Dharur तालुक्यातील चिंचपूरच्या नदीला Chinchpur River काल पूर होता. या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं, रात्री मोटारसायकलवर जात असलेले दोघेजण वाहून गेले असून यातील एकाचा मृतदेह सापडला आहे तर दुसरा अद्याप बेपत्ता आहे. महादेव सोनवणे असं सापडलेल्या मयत व्यक्तीचं नाव आहे तर उत्तम सोनवणे असं बेपत्ता असणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. दोघेही रा. उंदरी ता. केज येथील रहिवासी आहेत.

हे देखील पहा -

धारुर ते चिंचपूर रस्त्यावरील खारीचा पुल म्हणून ओळखला जाणाऱ्या नदीला काल अतिवृष्टीमुळे पुर आलेला होता. रात्री या पुलावरुन केज तालुक्यातील उंदरी येथील महादेव सोणवने व उत्तम सोणवने आपल्या दुचाकीवरुन जात होते. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह दोघे वाहून गेले. दरम्यान घटनास्थळी धारुर पोलिस व ग्रामस्थांनी रात्रीपासून मदतकार्य सुरु केले असून वाहून गेलेल्या एकाचा शोध अद्याप सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासाठी दोन अश्व सज्ज

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT