Unnatural Sexual Abuse of 7 Minor Boys In Nagpur संजय डाफ
महाराष्ट्र

Nagpur : विकृत तरुणाकडून ७ अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; आरोपी फरार

Unnatural Sexual Abuse of 7 Minor Boys In Nagpur : हा विकृत तरुण आंबा, चिंच तोडण्याच्या बहाण्याने लहान मुलांना लाडीगोडी लावून महाराजबाग परिसरात न्यायचा.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: नागपूरात (Nagpur) एका २८ वर्षीय विकृत तरुणाकडून तब्बल सात अल्पवयीन मुलांवर (Minor Boys) अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. हा विकृत तरुण आंबा, चिंच तोडण्याच्या बहाण्याने या लहान मुलांना लाडीगोडी लावून महाराजबाग परिसरात न्यायचा आणि तिथे निर्जनस्थळी नेऊन त्या अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Sexual Assault) करायचा. यानंतर तो त्या अल्पवयीन मुलांना झालेल्या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा, त्यामुळे अनेक अल्पवयीन बालके त्याच्या अनैसर्गिक अत्याचाराला बळी पडली होती. मात्र आता त्याचा गुन्हा समोर आला आहे. (Unnatural Sexual Abuse of 7 Minor Boys In Nagpur)

हे देखील पाहा -

या विकृत तरुणाने ज्या ७ अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केले होते त्यापेकी एका ९ वर्षांच्या मुलाने हिंमत करत आपल्या आई-वडिलांना झालेला सर्व प्रकर सांगितला. हे कळल्यावर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या विकृत तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वसंतराव नाईक झोपडपट्टी भागात उघडकीस आली असून त्या २८ वर्षीय विकृत तरुणाचं मयूर मोडक असं नाव आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT