Gondia Crime News saam TV
महाराष्ट्र

देवरी शहरात खळबळ! घरी परतलेल्या मुलांनी आईला पाहिलं अन् उघडकीस आली भयंकर घटना

गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

अभिजीत घोरमारे

गोंदिया : जिल्ह्यातील देवरी शहरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दागीने लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी एका महिलेची निर्घृण हत्या (Gondia crime update) केल्याची धक्कादायक घटना घडलीय. शशीकला साखरे (३५) असं मृत महिलेचं नाव आहे. शहरातील पंचशील चौक येथिल प्रभाग क्रमांक ६ मध्ये ही घटना घडली आहे. हल्लेखोराने महिलेचा हत्या करुन घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर घरी परतलेल्या मुलांनी आई शशीकला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची पाहिलं आणि ही भयंकर घटना उघडकीस आली. याप्रकरणी देवरी पोलीस (Police) आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील पंचशील चौक येथे एका महिलेची क्रूरपणे हत्या करण्यात आलीय. शशीकला साखरे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. चोरीच्या प्रकरणामुळं महिलेची हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक असोक बनकर व देवरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी रेवचंद सिंगनजुडे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सदर घटनेचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT