University exam Saam Tv
महाराष्ट्र

Breaking: राज्यातील विद्यापिठांच्या परीक्षा ऑफलाईनच; कुलगुरुंच्या बैठकीत निर्णय

नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

संजय डाफ

नागपूर: राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत निर्णय झाला आहे. सर्व विषयांच्या परीक्षा या ऑफलाइन पध्दतीने होणार आहेत. नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांची सुद्धा ऑनलाईन परीक्षेची मागणी होती. मात्र आता परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ऑफलाइन परीक्षेच्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे परीक्षा ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनानंतर आता प्रथमच विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

दरम्यान कोरोनानंतर शाळा, कॉलेज सुरु झाले आहेत. राज्य शासनाने सर्वच कोरोनाचे नियम मागे घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील प्रशासनाने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात विद्यापिठातील सर्वच शाखेच्या परीक्षा आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा, कॉलेज ऑनलाईन पद्धतीने सुरु होत्या. त्यामुळे परीक्षाही ऑनलाईन घेण्यात येत होत्या. परंतु विद्यार्थी या ऑफलाईन परीक्षेसाठी तयार नाहीत. एवढ्या सेमिस्टरचे पेपर ऑनलाईन पद्धतीने घ्या अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT