राष्ट्रीय महामार्गावर साचलेल्या पाण्यात जहाज सोडून युवकांची अनोखी गांधीगिरी ! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गावर साचलेल्या पाण्यात जहाज सोडून युवकांची अनोखी गांधीगिरी !

#PragatiKaHighway या हॅशटॅग सह तरुणांची ' सेल्फी ' मोहीम

दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर: लातूर लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील उमरगा-खामगाव जाणार्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. एच ३६१ वर रेणापूर- पानगाव रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वे गेट दरम्यान रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाल्याने रस्त्यावर चिखलाचे थैमान झाले आहे.

रस्त्यावर जमलेल्या चिखल आणि पाण्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मुख्य रस्त्यावरील चिखल आणि खड्ड्यामुळे दुचाकी वाहने नेहमीच घसरत आहेत. रस्त्याच्या अवस्थेमुळे अनेक अपघात घडले आहेत तर एका शाळकरी मुलाचा बळी गेला आहे तरी याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकातुन संताप व्यक्त केला जात आहे.

परंतु दर पावसाळ्यात रस्त्याचे हेच हाल होत असल्याने खड्डेमय रस्त्याला कंटाळुन पानगाव येथील युवकांच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने या विषयाकडे प्रशासनाचे आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात प्रतीकात्मक जहाज सोडून एक अनोखे आगळे-वेगळे आंदोलन केले.

ऊमरगा -खामगाव जाणार्या महामार्गाचे काम खरोळा फाटा ते पानगाव पर्यंतचे शेतकऱ्यांनी अडवल्याने रखडले आहे पानगाव मधील आण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वेस्टेशन पर्यंतचा रस्ता मोठ मोठे खड्डे पडल्याने व सध्या पावसाचे पाणी साचल्याने आणि पानंद रस्त्यात चिखल पण या रस्त्यावर त्यापेक्षा अधिक चिखल झाल्याने अपघात होत आहेत.

दिवसें दिवस रस्ता अपघात प्रवण क्षेत्र बनत चालला आहे. त्या अनुषंगाने पानगाव ग्रामस्थांच्यावतीने विविध पक्ष- संघटनांकडुन या विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी रस्ता दुरुस्त व्हावा या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊन आंदोलने करून मागणी केली होती. परंतु प्रशासनाने काहीच न केल्यामुळे युवकांनी गांधीगिरी करत रस्त्याच साचलेल्या पाण्यात प्रतिकात्मक जहाज सोडुन सेल्फी विथ पानगावचा रस्ता PragatiKaHighway या हॅशटॅगसह तरुणांनी रस्त्या सोबत सेल्फी काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.

या मोहीमेत पानगावातील अनेक युवकांच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चिखलमय रस्त्या सोबत सेल्फी काढून निषेध व्यक्त केला जात आहे. यावेळी जुनेद आतार, ज्ञानेश्वर पांचाळ, विवेक चव्हाण, गणेश गोरे पानगावकर, रजत पांचाळ,निळकंठेश्वर चव्हाण, ज्ञानेश्वर बायस, दत्ता गुडदे, ईर्शाद शिकलकर, अभिजित चव्हाण, पुरुषोत्तम पांचाळ, बबलु गडगिळे, माऊली सुर्यवंशी यांच्यासह अनेक युवक उपस्थित होते.पानगावचा मुख्य रस्ता लवकरात लवकर पूर्णपणे दुरुस्त करण्यात यावा यासाठी ग्रामस्थांतून आणि युवकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परिणिती चोप्राचा नवरा राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update : जळगावात एटीएम मशीन चोरीला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Skin Care Summer: उन्हाच्या कडाक्यात चेहऱ्याला लावू नका या गोष्टी, डॉक्टरांनी दिल्या टिप्स

Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics: राहुरीत राजकीय घडामोडींना वेग, भाजप उमेदवाराच्या विरोधात माजी मंत्री रिंगणात

SCROLL FOR NEXT