सांगलीत दलित महासंघाचा घोडे घेऊन मोर्चा!  विजय पाटील
महाराष्ट्र

सांगलीत दलित महासंघाचा घोडे घेऊन मोर्चा!

रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावेत या मागणीसाठी आज सांगली येथे महापालिकेसमोर दलित महासंघाने आगळे वेगळे आंदोलन केले.

विजय पाटील

सांगली : सांगली महापालिका परिसरातील रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावेत या मागणीसाठी आज महापालिकेसमोर दलित महासंघाने आगळे वेगळे आंदोलन केले. यावेळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोडे आणून मोर्चा काढला होता.

हे देखील पहा -

सांगली महापालिका परिसरात रस्ते दुरुस्ती आणि विकास कामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी फडणवीस सरकारच्या काळात महापालिकेला देण्यात आला होता. मात्र, एवढा निधी देण्यात येऊनही रस्त्यांची दुर्दशा आजही जैसे थेच असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. सांगली मनपा परीसरात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्ते खड्डेमय झाले आहेत.

जे रस्ते दुरुस्त केले गेले ते या पावसात खराब झाला आहेत. निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदाराकडून करण्यात आले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तर काही ठिकाणी औपचारिकता म्हणून मलमपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे या ठेकेदाराची सखोल चौकशी करावी.. आणि100 कोटी कुठे खर्च झाले याची माहिती देण्यात यावी. तसेच महापालिका आयुक्तांची चौकशी करावी या मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने सांगली महापालिकेवर घोडे आणून मोर्चा काढण्यात आला होता.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

SCROLL FOR NEXT