Corona Update: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह Saam Tv
महाराष्ट्र

Corona Update: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह

Corona Update: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar Corona Positive)

हे देखील पहा -

राज्यात वाढत्या कोरोना आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, तसेच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते. मात्र आता डॉ. भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळल्याने बैठकीत उपस्थित असलेल्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

April Grah Gochar: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या ग्रहाचं गोचर; बुधादित्य राजयोग एका रात्रीत पालटणार नशीब

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी; प्रवाशांचे प्रचंड हाल

Maharashtra News Live Update: दोन भूमिपूजन मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले - देवेंद्र फडणवीस

युद्ध पुन्हा पेटण्यास होर्मूझ कळीचा मुद्दा, अमेरिकन नौदलाकडून कडक नाकेबंदी

High blood pressure symptoms: रात्रीच्या वेळी ही लक्षणं दिसली तर समजा ब्लड प्रेशर वाढलंय

SCROLL FOR NEXT