केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन भारत नागणे
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari आणि केंद्रिय राज्यमंत्री जनरल वी.के. सिंह V.K. Singh यांनी आज पंढरपूर Pandharpur येथे विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

भारत नागणे

भारत नागणे

पंढरपूर: केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari आणि केंद्रिय राज्यमंत्री जनरल वी.के. सिंह V.K. Singh यांनी आज पंढरपूर Pandharpur येथे विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. याप्रसंगी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि राज्यमंत्री सिंह यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर , नगराध्यक्षा साधना भोसले , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,  माधवी निगडे आदी यावेळी उपस्थित होते.

पंढरपूरला जोडणारे पालखी मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेत मंदिर समितीच्या वतीने सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा ही त्यांनी घेतला.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child swallowed magnet: धक्कादायक घटना! खेळता खेळता सात वर्षांच्या मुलीने गिळला चुंबक, डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

Income Tax Return: करदात्यांनो सावधान! यंदा 'ITR' भरताना 'ही' एक चूक पडेल महाग; थेट येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस

Maharashtra News Live Update : लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी, पर्यटकांची पर्यटनासाठी वाढली येण्याची शक्यता..

Beed : 'जिवंत सोडणार नाही' म्हणत तरुणावर तलवारीने सपासप वार; बीडमधील खळबळजनक घटना

चेहऱ्यावर हवीय नैसर्गिक चमक? महागडे फेशिअल सोडा आणि रोज 'या' पद्धतीने लावा बर्फ

SCROLL FOR NEXT