Amit Shah News saam tv
महाराष्ट्र

Amit Shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द; कारण?

Amit shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नागूपर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. उद्या दोन दिवसांसाठी अमित शहा हे नागपूर दौऱ्यावर येणार होते.

संजय डाफ

Amit shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नागूपर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. उद्या दोन दिवसांसाठी अमित शहा हे नागपूर दौऱ्यावर येणार होते. अमित शहा हे नागपूरला एका कार्यक्रमासाठी येणार होते. मात्र, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय दुखवटा असल्यानं दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे . (Latest Marathi News)

उद्या अमित शहा (Amit Shah) हे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते . कार्यक्रमात अमित शहा यांच्या हस्तेच या इन्स्टिट्युटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होतं. या कार्यक्रमाला मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार होते.

अचानक दौरा रद्द झाल्यानं आता हा उद्घाटन कार्यक्रम अमित शहांच्या उपस्थितीशिवाय होणार आहे. तर हा कार्यक्रम आता - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, अमित शहा काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यांनी नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हजेरी लावली होती. . नवी मुंबईतील खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला होता. त्यानंतर पंधरा दिवसांमध्ये ते नागपूरच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय दुखवटा असल्याने अमित शहा यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

 पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचं काल वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं.  प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले. बादल यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT