unidentified woman found dead in asola chikhali buldhana  Saam TV
महाराष्ट्र

Chikhali Crime News : चिखली तालुक्यात तरुण विवाहितेची हत्या? मृतदेह पाहून पाेलिसही चक्रावले

बुलढाणा पाेलिस दल घटनेचा कसून तपास करीत आहेत.

संजय जाधव

Buldhana News :

चिखली (chikhali) तालुक्यातील असोला शिवारात आज (मंगळवार) सकाळी संतापजनक घटना उघडकीस आली. चिखली ते अंचरवाडी दरम्यान असलेल्या असोला गावा नजिक येथील एका ढाब्याच्या मागील बाजूस एका तरुण विवाहितेचा विवस्त्र व अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. बुलढाणा पाेलिस दल (buldhana police) या घटनेचा कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मृतक विवाहितेचे वय अंदाजे १९ ते २५ या वयोगटातील आहे. तरुणीचा आधी गळा आवळण्यात आला, डोक्यात मागील बाजूला दगडाचा वार करण्यात आला आणि अंगातील कपडे तिच्या चेहऱ्यावर टाकून जाळण्यात आले असे प्रथमदर्शनी दिसत आहे.

विवाहितेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आहे. तिला मारण्याआधी तिच्यावर अत्याचार केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल असे सुनील कडासने (जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा) यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील आदी उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत पोलिसांची आंदोलक शेतकऱ्यांवर दडपशाही, शक्तिपीठ महामार्ग मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Bhigwan Kidnapping Case: मध्यरा‍त्री 'ती' तरूणी पोलिस ठाण्यात हजर, म्हणाली झहीरसोबतच लग्न करणार...; भिगवणमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे...; 'हा' अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

Haldi Yellow Saree Designs: हळदीला पिवळ्या रंगाची साडी का नेसतात? माहितीये का?

Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

SCROLL FOR NEXT