Latur  Saam Tv
महाराष्ट्र

लातूर हादरलं! ज्या विहिरीने तहान भागवली तिथेच घडली शेतकऱ्यासोबत दुर्दैवी घटना

Latur Latest News : आपल्याच शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला

दीपक क्षीरसागर

लातूर : शेतातील विहीर (well ) ही शेतकऱ्यांसाठी पाण्याचे मोठे साधन असते. आपल्या शेतात विहीर असावी, तिला भरपूर पाणी असावं असं अनेक शेतकऱ्यांना वाटतं. मात्र, आपल्याच शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. मन हेलावून टाकणारी ही घटना लातूर तालुक्यातील भोसा येथे घडली आहे. व्यंकट नामदेव कुकर (वय 42 ) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकट कुकुरे यांच्या शेतात ऊसतोडीचे काम सुरू होते. गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांच्या शेतात ऊसतोड कामगार उसाची तोडणी करत होते. ऊसतोड मजूर शेतात आल्यामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी कुकरे हे विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले. अशातच विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा तोल गेला आणि ते विहिरीत पडले. विहिरीत जास्त पाणी असल्याने तसेच व्यंकट यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर व्यंकट यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बीट अंमलदार विष्णू चौगुले करीत आहेत. मयत व्यंकट यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestive Health : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT स्थापन; २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

Cotton Saree Designs: महिलांसाठी कॉटन साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नवरात्री आणि करवा चौथसाठी ठरतील बेस्ट

Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT