Akola Crime News Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! भाच्याची हत्या करून मामाने रचला बनाव; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

शेख अमीन शेख इकबाल असे आरोपी मामाचे नाव

जयेश गावंडे

अकोला : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे मामाने आपल्याच भाच्याची हत्या करून आत्महत्येचा बनाव केला होता. दरम्यान पोलिसानी आरोपीचा हा बनाव उघड करून त्याला अटक केली आहे. शेख अमीन शेख इकबाल असे आरोपी मामाचे नाव आहे. (Akola Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी अकोला शहरातील अकोट फाईल परिसरात शेख अकबर शेख अफर या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही घटना इंदिरानगर पोलीस ठाणे परिसरात घडली असल्याने अकोट फाईल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. ही आत्महत्या नसून हत्या असावी असा संशय पोलिसांना होता. याप्रकरणी पोलिसांनी मृत शेख अकबर याचा मामा शेख अमीन शेख इकबाल याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.

पोलीस चौकशीदरम्यान, आरोपीने पोलिसांना सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतर खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखा बोलू लागला. शेख अकबर याची आपणच रूमालाने गळा आवळून हत्या केली असल्याची कबुली आरोपी शेख अमीन यांनी पोलिसांना दिली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शेख अमीन, शेख इकबाल हा शेख अकबर, शेख अफसर याचा मामा आहे. दोघेही शेजारी राहतात. शेख अकबर हा व्यसनाधीन असल्याने, दररोज तो घरात धुडगूस घालायचा. कुटुंबीयांना वेठीस धरायचा. त्याच्या दररोजच्या त्रासाला कंटाळूनच मामाने त्याचा काटा काढला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

साखरपुड्यानंतर घराकडे येताना काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मृतदेह काढण्यासाठी बोलवावा लागला JCB

Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT