Ulhasnagar News  
महाराष्ट्र

Ulhasnagar Rada : उल्हासनगरमध्ये मोठा राडा! ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याच्या कारवर दगडफेक, उमेदवाराची मुलगीही उपस्थित

Ulhasnagar Rada News : कल्याण पूर्व मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला आणि दगडफेक झाली.

Namdeo Kumbhar

अजय दुधाणे, उल्हासनगर, साम टीव्ही प्रतिनिधी

Ulhasnagar Latest News : कल्याण पूर्व मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला आणि दगडफेक झाली. मध्यरात्री अज्ञात इसमाने हल्ला केला. ठाकरे गटाचे उमेदवार बोडारे यांची मुलगी यावेळी उपस्थित होती. याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. या घटनेमुळे कल्याण पूर्व मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे.

उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण पूर्व मतदार संघातील उबाठा गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर मध्यरात्री हल्ला करून दगडफेक करण्यात आली. यावेळी बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे सुद्धा एका गाडीत होत्या. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत होता. बोडारे यांची मुलगी आणि काही महिला तसेच काही कार्यकर्ते दोन कारमधून कॅम्प क्रमांक चार येथील ओटी सेक्शन येथून जात होते. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी या कारवर दगडफेक केली. या घटनेत एका गाडीचे नुकसान झालेय. रात्री उशिरापर्यंत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धनंजय बोडारे पोलीस स्टेशनमध्ये सदरची तक्रार दाखल करण्यासाठी हजर होते.

नेमकं झालं काय ?

ओटी सेक्शन भागात काही गाड्या आल्या आहेत, पैशांची वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती बोलारे यांच्या मुलीला माहिती मिळाली होती. गाड्या कोणत्या आहेत, कोणाच्या आहेत. त्या पैसे वाटण्यासाठी तर नाही आला ना. ही खात्री करण्यासाठी बोराडे यांची मुलगी धनश्री बोराडे काही महिला कार्यकर्ते, काही कार्यकर्ते दोन कारमधून जात होते. त्यावेळी त्यांच्यावर दगडफेक आणि काठीने हल्ला करण्यात आला.

तिरंगी लढत -

कल्याण पूर्वतील तिरंगी लढतीतील धनंजय बोराडे एक उमेदवार आहेत. ठाकरे गटाकडून ते मैदानात उभे आहेत. भाजपाकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड तसेच अपक्ष महेश गायकवाड मैदानात आहेत. गणपत गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. तेच महेश गायकवाड आता गणपत गायकवाड यांच्या पत्नीच्या विरोधात उमेदवारी लढवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT