Arrest Saam Tv
महाराष्ट्र

Guru Nanak Darbar: देवाला नमस्कार करुन पादुका चोरणारा अटकेत

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही तासातच या चोरट्याला शोधत त्याला बेड्या ठोकल्या.

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगरच्या (ulhasnagar) कॅम्प ४ मधील सेक्शन ३० मध्ये गुरुनानक दरबार आहे. या दरबारात शनिवारी (ता. १९ मार्च) रात्रीच्या सुमारास एक चोरटा (thieves) घुसला. या चोरट्यानं आधी मंदिरात (temple) देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर देवाच्या चांदीच्या पादुका उचलून रुमालात गुंडाळल्या. त्यानंतर पुन्हा देवाचं दर्शन घेत नमस्कार केला आणि पोबारा केला. (ulhasnagar latest marathi news)

काही वेळानं पादुका जागेवर नसल्याची बाब मंदिराच्या सेवेकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी सीसीटीव्ही तपासलं. त्यामध्ये लाल रंगाचा शर्ट घातलेला एक इसम दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात आला आणि पादुका चोरून नेल्याचं निष्पन्न झालं.

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही तासातच या चोरट्याला शोधत त्याला बेड्या ठोकल्या. नितीन पाईकराव (वय ३२) असे चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून चोरलेल्या पादुकाही हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT