Ulhasnagar painter body was found burnt  Saam Tv News
महाराष्ट्र

Thane Crime : हात वाकलेले, शरीर संपूर्ण काळंकुट्ट पडलेलं, राहत्या घरात पेंटरचा मृतदेह आढळला; ठाण्यात खळबळ

Ulhasnagar Body Found in House : राम याने स्वतः जळून घेतलं? की त्याला कोणी पेटवलं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Prashant Patil

ठाणे : राज्यात दिवसेंदिवस गु्न्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक घटना ठाण्यातील उल्हासनगरमध्ये एका इसमाचा जळलेला मृतदेह सापडला आहे. कॅम्प ५ मधील गणेश नगर भागात राहत्या घरातच या व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

दरम्यान, ज्या व्यक्तीचा मृतदेह घरात आढळला आहे, त्याचं नाव राम सुराडकर असं नाव असून सकाळच्या सुमारास त्याच्या घरातच त्याचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह स्थानिकांना आढळून आला. दरम्यान, राम याने स्वतः जळून घेतलं? की त्याला कोणी पेटवलं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सुरडकर हा पेंटिंगची कामं करून उदरनिर्वाह करत होता. त्याचं लग्न झालं असलं, तरी तो बायकोपासून विभक्त राहत होता. त्यामुळे याच नैराश्यातून त्याने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र तरी देखील पोलीस ही हत्या आहे की आत्महत्या आहे? या दोन्हीही बाजूंनी तपास करत आहेत.

४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला

दरम्यान, मुलगी नको म्हणून एका नराधम बापानं आपल्या चार महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना घाटकोपर पूर्वमध्ये घडली आहे. आरोपी आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहतो. त्याला तिसरे अपत्य मुलगी झाली म्हणून तो चिडला. या कारणामुळे तो पत्नीसोबत वारंवार भांडण करत होता. राग अनावर झाल्यामुळे त्यानं थेट पाळण्याच्या दोरीने गळा आवळून हत्या केली आहे. आरोपी बापाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खरात हा श्रीमंत लोकांचा बाबा,गरीब श्रद्धा पाळतात अंधश्रद्धा नाही- मनोज जरांगे पाटील

Thursday Horoscope: स्वामींच्या कृपेने हाती येईल पैसा, गुरुवारी ५ राशींच्या महत्वाच्या अडचणी होतील दूर

Viral Video: महिलेने धावत्या कॅबमध्येच केली लघवी; ड्रायव्हर भडकताच दोघांमध्ये मोठा वाद, व्हिडीओ व्हायरल

४ दिवस पावसाचे! पुण्यात अचानक गारांचा तडाखा, कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पाऊस; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना अलर्ट

Politics News: १२ महासचिव अन् ८ सचिव; NDAच्या घटक पक्षात उलटफेर; अख्ख्या राष्ट्रीय कार्यकारणीत मोठा फेरबदल

SCROLL FOR NEXT