Rain Alert Saam tv
महाराष्ट्र

Rain Alert : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागात दमदार पाऊस

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागात दमदार पाऊस

अजय दुधाणे

उल्हासनगर : राज्यातीळ सर्वच भागात पावसाने दडी मारली होती. परंतु हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात (Rain) पाऊस सक्रिय होऊ लागला आहे. (Ulhasnagar) उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात देखील रात्रीच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. (Latest Marathi News)

मागील काही दिवसांपासून गेलेल्या पावसाने गोकुळाष्टमीला हजेरी लावली आहे. दडी मारलेल्या पावसाने आज रात्रीपासून दमदार पाऊस उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये पडत आहे. आज दुपारी देखील पाऊस सुरु आहे. यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. 

पावसात दहीहंडी उत्सव 

उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर भागात मोठमोठ्या दहीहंडीचे आयोजन केले आहे. या दहीहंडी उत्सवात नटनटी बोलविण्यात आले आहेत. सायंकाळच्या सुमारास या दहीहंड्या फोडण्यात येतील आणि विविध कार्यक्रम केल्या जाणार आहेत; असाच पाऊस संध्याकाळपर्यंत पडत राहिला. तर मात्र जोरदार पावसामुळे कुठेतरी उत्सवाचा उत्साह कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दहीहंडी उत्सवाला होणारी गर्दी यामुळे कुठेतरी कमी होणार आहे. मात्र आज पडत असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने नागरिकांची सुटका झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात, विदर्भात थंडी कायम

Mumbai Local : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल सेवा खोळंबली, ठाण्याकडे जाणारी मार्गिका ठप्प

Figs Benefits: सकाळी रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने शरीराला होतात हे ९ मोठे फायदे

Local Body Election : नाशिकमध्ये ठाकरेंना जोरदार धक्का, हुकमी एक्का भाजपात प्रवेश करणार

Tuesday Horoscope: ४ राशींच्या व्यक्तींना गुंतवणूक ठरेल लाभदायक, पैशाची तंगी होईल दूर, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT