Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : टोळक्याच्‍या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू; धक्का लागल्याच्या रागातून मारहाण

टोळक्याच्‍या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू; धक्का लागल्याच्या रागातून मारहाण

अजय दुधाणे

उल्हासनगर : रस्त्यावर जाताना धक्का लागल्याने एका व्यक्तीला टोळक्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना (Ulhasnagar) उल्हासनगरमध्ये घडली. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेत मारहाण झालेल्या व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

उल्हासनगर कॅम्प नंबर ४ परिसरात राहणारे राजेश कुकरेजा हे रविवारी रात्रीच्या सुमारास आपल्या घरी होते. या दरम्‍यान सतरामदास हॉस्पिटलजवळ राजेश कुकरेजा यांचा काही तरुणाला धक्का लागला. या रागातून या टोळक्याने राजेश यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यानंतर राजेश यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

मुलाच्‍या फिर्यादीवरून गुन्‍हा दाखल

राजेश कुकरेजा यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं होते. मात्र उपचारादरम्यान राजेश यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी राजेश यांचा मुलगा तरुण याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बाळा उर्फ समीर गायकवाड, गौरव गोडिया, मनीष दुसेजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटीजचे रूग्ण बटाटा खाऊ शकतात का?कोणत्या पदार्थांमुळे वाढते रक्तातील साखर

Suraj Chavan : गुडन्यूज! सूरज चव्हाण होणार बाबा? बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा VIDEO आला समोर

Pune : पत्नीसोबत चॅटिंग केल्याने तरुणाचे अपहरण; दिवेघाटात जिवे मारणार इतक्यात पोलिसांची 'सिनेस्टाइल' एन्ट्री

प्रफुल्ल पटेलांचे PA ते खासदार, सुनेत्रा पवारांनी संधी दिलेले राजेंद्र जैन कोण? पाहा A टू Z माहिती

Mumbai T20 League 2026: नॉर्थ मुंबई पँथर्स ‘अजिंक्य’च; ईगल ठाणे स्ट्रायकर्सवरचा पराभव करत मिळवला सलग चौथा विजय

SCROLL FOR NEXT