Ulhasnagar Eknath Shinde vs BJP: शिंदे-भाजप गटातील बॅनर वाद आता विकोपाला पोहचला आहे. भाजपने शिंदे गटातील मतदारसंघात हस्तक्षेप सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत थेट राजीनामा देण्याची भाषा केली. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बॅनर वाद सुरू झाला. उल्हासनगरमध्ये शिंदे गटाने बॅनर लावत भाजपला डिवचलं होतं. आता भाजपने पुन्हा बॅनर लावत थेट इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. (Latest Marathi News)
उल्हासनगरात पुन्हा एकदा शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि भाजपमध्ये बॅनरवॉर पाहायला मिळाला. भाजपने बॅनर लावत शिवसेना शिंदे गटाला थेट डिवचलं आहे. ५० कुठं आणि १०५ कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!, असा मजकूर असलेले बॅनर्स उल्हासनगरात लावण्यात आले आहेत.
उल्हासनगरमध्ये भाजपने लावलेल्या या बॅनर्सवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो आहे. त्याखाली किंगमेकर असं लिहिलं आहे. याच बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्यासह पंकजा मुंडे तसेच रवींद्र चव्हाण यांचेही फोटो आहेत. उल्हासनगरमधील मार्केट एरियामध्ये लागलेल्या या बॅनर्सची जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान, उल्हासनगरमध्ये शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डिवचलं होतं. "कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है...! माझा नेता माझा अभिमान" अशा आशयाचे बॅनर उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये शिंदे गटाने लावले होते.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उत्तर देत टोला लगावला. 'युतीची सत्ता आल्यावर छोटे छोटे काही कार्यकर्त्यांना आम्हीच शिंदे साहेब (Eknath Shinde) आहोत, आम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, असा टोला आमदार गणपत गायकवाड यांनी लगावला होता.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.