Ulhasnagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी रस्त्यात गाठत केले भयानक कृत्य; उल्हासनगरातील रात्रीची घटना

Ulhasnagar News : कामावरून येत असताना रात्रीच्या सुमारास त्याच्या ओळखीचे कामगार श्याम जयस्वाल, गुलशन कुमार, भोला कुमार आणि भोला याचा नातेवाईक अशा चौघांनी त्याला रस्त्यात अडवत लाटण्याने मारहाण केली

अजय दुधाने

उल्हासनगर : जीन्स फॅक्टरीत काम करत असलेल्या तरुणाला त्याच्या सोबत काम करत असलेल्या सहकारी कामगारांकडूनच बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जीन्स फॅक्टरीमध्ये काम करू नको, असं म्हणत या तरुणाला त्याच्या सहकारी कामगारांकडून लाटण्याने आणि दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील समता नगर परिसरात राहणारा अरविंद जयस्वाल (वय २१) या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. अरविंद जयस्वाल हा तरुण जीन्स फॅक्टरीमध्ये काम करतो. दरम्यान कामावरून येत असताना रात्रीच्या सुमारास त्याच्या ओळखीचे कामगार श्याम जयस्वाल, गुलशन कुमार, भोला कुमार आणि भोला याचा नातेवाईक अशा चौघांनी त्याला रस्त्यात अडवत लाटण्याने मारहाण केली. 

मारहाण करून चौघेजण फरार 

थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा त्याच्या घरासमोर जाऊन अरविंद याच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. या मारहाणीत अरविंद जयस्वाल हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीनंतर चारही आरोपी तिथून पळून गेले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

बदलापुरात दोन गटात फ्री स्टाईल 

बदलापुरात दोन गटात फ्री स्टाईल, हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बदलापूर पश्चिमेच्या मांजर्ली परिसरातील पाटील नगर भागातला हा व्हिडिओ असल्याचं सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण, पुरुष आणि महिला यांच्यामध्ये काही कारणावरून हाणामारी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र हा वाद नेमका कशावरून झाला? ही माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार दिलेली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT