Ulhasnagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : रिक्षा चालकाच्या घरावर गोळीबार; उल्हासनगरातील पहाटेच्या सुमाराची घटना

Ulhasnagar News : पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या घराबाहेर येऊन अतिशय जवळून घराच्या दरवाजा आणि खिडकीवर दोन गोळ्या झाडल्या

अजय दुधाने

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका रिक्षा चालकाच्या घरावर पहाटेच्या सुमारास अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. उल्हासनगरच्या माणेरे गावात ही घटना घडली. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसून या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.

उल्हासनगरच्या (Ulhasnagar Crime) माणेरे गावात प्रमोद भोईर हे रिक्षा चालक वास्तव्याला आहेत. दरम्यान आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या घराबाहेर येऊन अतिशय जवळून घराच्या दरवाजा आणि खिडकीवर दोन गोळ्या झाडल्या. सुदैवानं यात कुणीही जखमी झाले नाही. गोळी झाडल्याचा (Crime News) आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. 

दुचाकीवरून आलेला हल्लेखोर भोईर यांच्या घराकडे येताना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला असून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. घटनेचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गोळीबार करणाऱ्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT