Ulhasnagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime : मांजरीचं नखं लागल्याने कुटुंबाला बेदम मारहाण; दोन जण जखमी, उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

Ulhasnagar News : कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून वाद झाल्याच्या घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र शेजाऱ्यांनी पाळलेल्या मांजरीवरून वाद होऊन मारहाण झाल्याची घटना उल्हासनगर येथे समोर आली आहे

अजय दुधाने

उल्हासनगर : शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला मांजरीचे नखं लागल्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना उल्हासनगरच्या इमली पाडा परिसरात घडली आहे.

कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून वाद झाल्याच्या घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र शेजाऱ्यांनी पाळलेल्या मांजरीवरून वाद होऊन मारहाण झाल्याची घटना उल्हासनगर येथे समोर आली आहे. या घटनेत पूजा रोंदिया यांच्या घरी मांजरी आहेत. तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अमित रोंदिया यांच्या घरातील एका लहान मुलाला मांजरीचं नखं लागले. यातून दोन्ही परिवारांमध्ये वाद निर्माण झाला. 

वादाचे रूपांतर हाणामारीपर्यंत पोहचले

दरम्यान मांजरीचे नखं लागल्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबात वाद झाले आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. यात अमित रोंदिया, विकास रोंदिया आणि नंदा रोंदिया या तिघांनी मिळून शेजारी राहणारे पूजा आणि त्यांचे पती राकेश यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत पूजा रोदिया याना दुखापत झाली आहे. तर राकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलिसात दिली तक्रार 

दरम्यान सदर मारहाणीची घटना घडल्यानंतर दोन्ही जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. याप्रकरणी त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: चांदवड टोलनाक्यावर लाखो रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त

घरात कोळशाचा धूर केला, नंतर विषारी औषधाचे सेवन, कुटुंबाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, धक्कादायक कारण समोर

Hair Care: केसात खूप कोंडा झालाय? 'हे' ७ सोपे उपाय करतील प्रॉब्लेम दूर, केसही राहतील हेल्दी

Ladki Bahin Yojana : लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली! अंतिम यादी जाहीर; आता लाडकी बहीण योजनेचा ₹1,500 चा हप्ता कधी येणार?

Mumbai Tourism : मुंबईच्या पावसात 'या' ठिकाणी फिरण्याची मजा काही वेगळीच, रविवारी मित्रांसोबत घालवा निवांत संध्याकाळ

SCROLL FOR NEXT