Ulhasnagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime News : दारू पिताना मित्रांमध्ये बिनसले; वाद टोकाला गेल्याने मित्रालाच संपविले

Ulhasnagar News : हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागील प्रेमनगर टेकडी परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. यातील संशयित आरोपी शकील शेख आणि मयत अनिल कांबळे हे दोन्ही मित्र असून ते नाका कामगार आहेत

अजय दुधाने

उल्हासनगर : दोघे मित्र घरी दारू आणून सोबत पिण्यासाठी बसले. दारू पिल्यानंतर थोड्या वेळानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दोन्ही मित्रांमधील हा वाद टोकाला गेल्यानंतर दारूच्या नशेत मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी मारेकरी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत सदरची घटना घडली आहे. यात अनिल कांबळे याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागील प्रेमनगर टेकडी परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. यातील संशयित आरोपी शकील शेख आणि मयत अनिल कांबळे हे दोन्ही मित्र असून ते नाका कामगार आहेत. कायम सोबत राहत असल्याने दोघेजण दारू पिण्यासाठी कायम सोबत जात असत. 

किरकोळ वादात केली हत्या 

गुरुवारी संध्याकाळी देखील दोघांना दारू पिण्याचे ठरविल्याने अनिल कांबळे हा शकील शेख याच्या प्रेमनगर टेकडी भागातील घरी दारू पिण्यासाठी गेला होता. दारू पिण्यास सुरवात झाल्यानंतर काही वेळात दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद निर्माण झाला. दारूची नशा असल्याने या वादात शकीलने लाकडी दांडक्याने अनिलवर प्रहार केला. यात अनिलचा जागीच मृत्यू झाला. 

मारेकरी पोलिसांच्या ताब्यात 

दरम्यान घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तर संशयित आरोपी शकील शेख यालाही तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणी हिललाईन पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT