Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : मध्यवर्ती रुग्णालयात आरोपीकडून रुग्णावर हल्ला; रुग्ण गंभीर जखमी, पोलीसात गुन्हा दाखल

Ulhasnagar News : उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बाबासाहेब सोनावणे याने ब्लेडने हल्ला केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. यानंतर आता पुन्हा मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णावर त्याच आरोपीने हल्ला केला. यात रुग्ण गंभीर जखमी झाला आहे. 

उल्हासनगरच्या (Ulhasnagar News) विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बाबासाहेब सोनावणे याने ब्लेडने हल्ला केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. हल्ला करताना बाबासाहेब सोनावणे हा देखील जखमी झाला होता. यामुळे त्याच्यावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान यावेळी त्याच्या बाजूच्या बेडवर उपचार घेत असलेल्या सलमान सय्यद या तरुणावर आरोपी बाबासाहेब सोनावणे याने चक्क स्टीलच्या खुर्चीने हल्ला (Crime News) केला.

सलमान सय्यद याच्या डोक्यात, तोंडावर खुर्चीने प्रहार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. आरोपी बाबासाहेब सोनवणे हा वेडसर असल्यासारखा वागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT