Foam-like toxic layer seen floating on Ujani Dam water amid rising pollution and cancer concerns in Solapur Saam Tv
महाराष्ट्र

उजनीचं धरण ठरतंय कॅन्सरचं कारण? सोलापुरात दररोज कॅन्सरचे ६० रूग्ण?

60 Cancer Cases Daily in Solapur: तहान भागवणा-या उजनी धरणाचं पाणीच सोलापूरकरांच्या मुळावर उठलंय. उजनीचं पाणी नागरिकांसाठी कॅन्सरचं कारण ठरतंय. विधानसभेत ही माहिती कोणी दिली? जलतज्ञांनी काय इशारा दिलाय?

Bharat Mohalkar

सोलापूर, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान मानलं जाणारं उजनी धरण सोलापूरच्या नागरिकांसाठी शाप ठरायला लागलंय... हा शेवाळासारखा तवंग दिसतोय... तो फक्त तवंग नाही तर चक्कं विष आहे विष.... हे पाणी पिण्यासाठीच नाही तर शेतीसाठीही घातक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय..

एवढंच नाही तर उजनीचं दुषित पाणी पिल्याने सोलापूरात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण आढळत असल्याचं आमदार देवेंद्र कोठेंनी अधिवेशनात सांगितलं... आणि राज्यात एकच खळबळ उडाली... महाराष्ट्रातील सर्वात मोठं 117 टीएमसी क्षमतेचं उजनी धरण... सोलापूर, अहिल्यानगर आणि पुणे जिल्हा सुजलाम् सुफलाम करण्यासाठी बांधण्यात आलं... मात्र गेल्या 30 वर्षांपासून एमआयडीसीतील दुषित पाणी नद्यांमार्गे उजनीत येत आहे... याच दुषित पाण्यामुळे उजनीतील मासे मेल्याचं समोर आलं...

त्यावरुनच जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनीही उजनीचं पाण्यामुळे कॅन्सरचा धोका वाढत असल्याचा इशारा दिला होता.. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात दररोज 60 पेक्षा जास्त कॅन्सरचे रुग्ण आढळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.. त्यामुळे उजनी धरणात दुषित पाणी सोडून सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंपन्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विजयदुर्ग ते मुंबई रो-रो जलवाहतूक बोट मुंबईकडे रवाना

Zumba Benefits: वजन कमी करण्यासाठी योगा किंवा एक्सरसाइजपेक्षा छान गाण्यावर करा झुंबा, मिळतील 'हे' फायदे

Friday Horoscope: नव्या संधीमुळे दिवस उत्साहात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींची चांदीच चांदी होणार; वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

मोठी बातमी! राज्यपालांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

दर्शनासाठी ‘VIP स्कीम’चा सापळा; त्र्यंबकेश्वरमध्ये दलालांचा धुमाकूळ|VIDEO

SCROLL FOR NEXT