Udgir Rural Police Station दिपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Udgir Crime News: महिला घरात एकटीच होती...; संधी साधत नराधमाने केलं संतापजनक कृत्य

उदगीर तालुक्यातील शंभूउमरगा येथील एका व्यक्तीने घरात घुसून ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला आहे.

दीपक क्षीरसागर

Udgir Crime News: उदगीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला घरात एकटी असताना तिच्या घरात घुसून नराधमाने तिचा विनयभंग केला आहे. या घटनेत महिलेला मारहाण देखील करण्यात आली आहे. (Latest Udgir Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील शंभूउमरगा येथील एका व्यक्तीने घरात घुसून ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला आहे. यावेळी त्याने महिलेला मोठ मोठ्याने शिवीगाळ केली.तसेच तिला मारहाण करत हाताला धरून तिच्याशी झटापट केली. घटना घडताच महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनराज शिवदास काळे याने फिर्यादी महिलेच्या घरात पती नसल्याचा फायदा घेऊन घरात घुसून महिलेस शिवीगाळ केली. हाताला धरून जवळ ओढून झोंबाझोंबी करून स्त्री मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला.

तर लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवेमारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार पीडितेने नोंदवली आहे. त्यामुळे उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

स्नॅपचॅटवरील मैत्री अल्पवयीन मुलीला महागात

नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात १० फ्रेबुवारी रोजी अशीच एक विचित्र घटना घडली आहे. एका १४ वर्षीय शाळकरी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडीओ स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करुन तिचा विनयभंग करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकाच महिन्‍यात १२ मुलींचा अशा पद्धतीने विनयभंग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भोंदूबाबा खरातचे भक्तजाळे राज्याबाहेरही, अनेक मंत्र्यांपर्यंत लागेबांधे

Homemade Dishwasher : विकत कशाला? भांडी धुण्याचा साबण घरीच बनवा, मिनिटांत भांडी लख्ख चमकतील

Maharashtra Live News Update: चवदार तळ्याचे पाणी MIDC शुद्ध करणार -मंत्री संजय शिरसाट

Shocking : १३ व्या मजल्यावरून ज्योतिषाची आत्महत्या; पोलिसांनी घराचा दरवाजा उघडताच सापडला आईचा मृतदेह; नेमकं काय प्रकरण? वाचा

Hill Station In Satara : महाराष्ट्रात राहून घ्या काश्मीरचा फिल, साताऱ्यातील 'हे' ठिकाण Summer ट्रिपसाठी ठरेल सुपर Cool

SCROLL FOR NEXT