narayan rane, uddhav thackeray, Barsu Refinery, Ratnagiri saam tv
महाराष्ट्र

Barsu च्या दिशेने उद्धव ठाकरे रवाना, नारायण राणेंचा दाैरा रद्द; माेर्चासाठी राणे बंधू सज्ज (पाहा व्हिडिओ)

राजापूर येथे आज रिफायनरी समर्थक आणि विरोधक हे समाेरा-समाेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर / निवृत्ती बाबर

Narayan Rane News : बारसू प्रकल्पाला (barsu refinery) विरोध दर्शविणा-या ग्रामस्थांना भेटण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (शनिवार) सकाळी मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरातील बारसूकडे (uddhav thackeray to visit barsu today) रवाना झाले आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बारसू दाैरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राणे हे कर्नाटक राज्यात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार असल्याचे समजते. त्यामुळेच त्यांचा दाैरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरु हाेताच काही ग्रामस्थांनी याला विरोध केला. त्यातून आंदाेलन उभं राहिले. या आंदाेलन काळात आंदाेलकांवर पाेलिसांनी लाठीचार्च केला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं. आता आंदाेलक ग्रामस्थांची भेट घेण्याकरता उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या (uddhav thackeray visit to barsu) रवाना झाले आहेत. त्यांना या भागात केवळ ग्रामस्थांची भेट घ्यावी लागणार आहे. त्यांच्या सभेस पाेलिसांनी परवानगी नाकारली आहे.

दूसरीकडे राजापूर मधील जवाहर चौक परिसरात बारसु रिफायनरी प्रकल्प समर्थकांचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

राजापूर येथे आज रिफायनरी समर्थक आणि विरोधक हे आमने-सामने येण्याची शक्यता असल्याने पाेलिसांवर माेठा ताण असल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणि सॉफ्टनेस पाहिजे? मग घर बनवलेला हा फेसमास्क नक्की लावा

Maharashtra Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

6,6,6,6,6,6...IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक; उर्विल पटेलचा तडाखा, अवघ्या १३ चेंडूंत ठोकली फिफ्टी

पाण्याअभावी रहिवासी हैराण; डोंबिवलीत बिल्डरविरोधात जोरदार आंदोलन

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील पीडित मुलीचे आई-वडील मूक मोर्चात सहभागी

SCROLL FOR NEXT