Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : चुनाव आयोग नाही, चुना लावणारा आयोग; उद्धव ठाकरेंचा EC वर निशाणा, अमित शहांना म्हणाले 'मोगॅम्बो'

Uddhav Thackeray : निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यामध्ये फरक आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्याला शेवटची आशा आहे असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

Chandrakant Jagtap

Uddhav Thackeray : मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने स्थानीय लोकाधिकार महासंघाच्या वतीने 'जागर मराठी भाषेचा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. हा चुनाव आयोग नाही तर चुना लावणारा आयोग आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने मध्ये चोम्बडेपणा करायची गरज नव्हती. हा चुनाव आयोग नाही तर चुना लावणारा आयोग आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यामध्ये फरक आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्याला शेवटची आशा आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर देखील हल्लाबोल केला. संस्कार अतिशय महत्त्वाचे असतात. कारण बाकी काहीही चोरलं जाऊ शकतं पण संस्कार चोरले जाऊ शकत नाहीत असे म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नाव न घेता टोला लगावला. (Latest Marathi News)

पुढे बोलताना ते म्हणाले, स्वत:च्या आई वडिलांना अडगळीत टाकून दुसऱ्याचे आई वडील चोरत आहेत. दिवारच्या डायलॉगप्रमाणे मेरा बाप चोर है असं यांचं झालं आहे. आताची गद्दार लोक स्वत: त्यांच्या कपाळावर चोर लिहत आहेत. निर्लज एवढे की एक पिक्चर आला होता चोरीचा मामला हळू हळू बोंबला, पण हे जोरात बोंबलत आहेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे यांचा उल्लेख न करता उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या ज्या वेळी छातीवर धनुष्यबाण लावतील तेव्हा त्यांच्या कपाळावर चोर लिहिलेले असेल. हिम्मत असेल तर तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीच्या मैदानात या, आम्ही मशाल घेऊन येतो, असे आव्हान देखील त्यांनी दिले. (Latest Political News)

ते म्हणाले, आता अनिलने मला धनुष्यबाणात मशाल असं चिन्ह दिलं आहे. शिवसेना हा धगधगता विचार आहे. मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी काही होणार नाही. शेंडे बुडके उडवा, मात्र मूळं घट्ट आहेत. ही लढाई सोपी नाही. दूध का दूध पाणी का पाणी आम्ही करणार आहोत. तुमचं गोमूत्र कसं आहे हेही आम्ही दाखवणार आहोत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शाहांवरही हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT