Thackeray Sena workers prepare for ‘My Sindoor, My Nation’ protest against India–Pakistan cricket match, accusing PM Modi of double standards on patriotism. Saam Tv
महाराष्ट्र

India Pakistan Cricket Match: खेळ मांडला.. ! भारत-पाकिस्तान सामन्याआधीच भाजप सरकार-ठाकरेंमध्ये 'सामना'

Political Storm Over India–Pakistan Cricket: भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन ठाकरेसेनेनं थेट पंतप्रधान मोदींना घेरलंय.. मात्र ठाकरेसेना पाकिस्तानविरोधात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचा कसा विरोध करणार आहे? आणि ठाकरेंनी मोदींवर कसा निशाणा साधलाय?

Girish Nikam

पंतप्रधान मोदींनी रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही, असा इशारा पाकिस्तानला दिलाय. आणि दुसरीकडे आशिया कपमध्ये 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याला परवानगी दिलीय.. ह्याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी मोदींना घेरलंय.. मोदी देशभक्तीचा व्यापार करत असल्याचा आरोपच ठाकरेंनी केलाय... त्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.

भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असला तरी पहलगाममधील मृतांचं रक्त अजूनही सुकलं नाही... त्यांच्या नातेवाईकांच्या जखमा अजूनही भळभळत्या आहेत.. त्यापार्श्वभुमीवर भारत पाकिस्तान सामना होणार असल्याने मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळलं जात असल्याचा आऱोप केला जातोय... त्यामुळेच ठाकरेसेनेच्या महिला आघाडीकडून रविवारी 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन करण्यात येणार आहे. आक्रमकपणे आंदोलन करा, पंतप्रधानांना सिंदूर पाठवा असं आवाहनच उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांना केलंय. क्रिकेटवरुन भाजप-ठाकरेसेना आमनेसामने आली असताना 'माझा लादेन, माझं पाकिस्तान अभियान चालवा'.. असं म्हणत भाजप नेते नवनाथ बन यांनी पलटवार केलाय

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. ठाकरे सेना आणि मनसे खांद्याला खांदा लावुन भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरून रस्त्यावर उतरत आहे. आता भारत-पाक सामन्याच्या आंदोलनावरुन ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही चैतन्य निर्माण झालंय. सरकार विरोधातली ही आंदोलनाची मॅच ठाकरे सेना जिंकते का? ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT