Uddhav Thackeray demand to freeze Shiv Sena bow and arrow symbol saam tv
महाराष्ट्र

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Shiv Sena Symbol Row: आता बातमी आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह खटल्यासंदर्भातली. सुप्रीम कोर्टात शिंदेसेनेकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. एव्हंढच नाही तर येत्या 15 सप्टेंबरला शिंदेसेनेच्या युक्तिवादाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र, शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी गुगली टाकलीये. पाहूयात यासंदर्भातला एक रिपोर्ट.

Rohit Kadam

  • ठाकरे गटाने शिवसेनेचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह न मिळाल्यास ते गोठवण्याची मागणी केली

  • शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील अंतिम टप्प्यातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू

  • 2022 मध्ये निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिले होते.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. ठाकरेसेनेचां युक्तिवाद संपवल्यानंतर सध्या शिंदेसेनेकडूनही कोर्टात युक्तिवाद केला जातोय. मात्र, आता ठाकरेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलंय. आधी धनुष्यबाणासाठी लढणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता थेट पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केलीये. आमचा पक्ष आणि चिन्हं चोरलं, त्यांना चोरीचा माल वापरू देऊ नका, असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे, आम्हीच उठाव करून 4 वर्षांपूर्वी धनुष्यबाण पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आणल्याचं सांगत शिंदेसेनेनं ठाकरेंवर पलटवार केलाय.

येत्या 15 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात शिंदेसेनेकडून पुन्हा युक्तिवाद केला जाणार आहे. शिंदेसेना नेमका काय युक्तिवाद करणार, याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात लक्षवेधी ठरलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह खटल्यात उद्धव ठाकरेंनी अनपेक्षित भूमिका घेतल्यानं या खटल्याची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT