मविआ सरकार विकासाचे मारेकरी होते. तसेच उद्धव ठाकरेंनी राज्यातील लोकांना अंधारात ढकलले असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंतप्रधान मोदींच्या सभेआधी माध्यम प्रतिनिधिंशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष महाराष्ट्रावर दरोडा टाकल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरोडेखोर कोण विकास करणारे की विकासाचे मारेकरी? ज्यांनी अडीच वर्षात या महाराष्ट्रात फक्त दरोडाच टाकला. लोकांना अंधारात ढकलले, राज्याला दहा वर्षे मागे नेले, सर्व विकासकामे बंद केले मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, मेट्रो बंद हे सर्व प्रकल्प बंद केले. या लोकांनी कोविडमध्ये देखील कोविड सेंटरमध्ये, खिचडीमध्ये, डेड बॉडीच्या बॅगमध्ये घोटाळा केल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केला. त्यामुळे ते दरोडा टाकणारे ते आहेत.
आम्ही अडीच वर्षात विकास केला. कल्याणकारी विकास योजना आणल्या. विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड घातली त्यामुळे जनतेला माहित आहे दरोडा कुणी टाकला, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
फेक निगेटिव्ह पसरवून मुस्लीम लोकांना घाबरून महाविकास आघाडीने प्रचार केला. संविधान बदलणार हे सर्व सांगून मुसलमान आणि दलितांना महाविकास आघाडीने फसवले. संविधान बदलू शकत नाही, पण फेक नेरिटीव्ह यांनी पसरवले. पण आता फसलेले लोक देखील हुशार झाले हे त्यांना माहिती आहे. ख्रिश्चन, मुस्लिम आणि आदिवासी सर्वांनाच आम्ही पैसे देत आहोत, त्यामुळे आमच्यासाठी सर्व समान आहेत.
या वाक्याचा तुम्ही सर्वांनी चुकीचा अर्थ घेतला. एक राहू सेफ राहू म्हणजे एकत्र राहणे एकोप्याने राहणे हा गुन्हा आहे का? ब्रिटिशांची तोडो फोडे राज करो तीच विचारसरणी आता काँग्रेसने अंगीकारली आहे तोडायचे फोडायचे आणि राज्य करायचे, तोडफोड करून सत्ता मिळवा हे काँग्रेस करत आहे मोदींनी सांगितलं एक राहा सोबत राहा एकत्र होऊन मतदान करा हे त्यांनी सांगितल आहे, तुम्ही अर्थ वेगळा घेतला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. किशनचंद तनवाणी यांच्यासोबत १०० पेक्षा जास्त आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर जिल्हाप्रमुख पदावरून हटविलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी हे नाराज होते. अखेर किशनचंद तनवाणी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.