Uddhav Thackreay Saam Tv
महाराष्ट्र

चला कामाला लागू या! भाजपची पाॅवर राेखण्यासाठी सेना सज्ज; एमआयएम युतीवरुन उद्धव ठाकरे म्हणाले...

एमआयएम सोबत कोणतीही युती होणार नाही - उद्धव ठाकरे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - गेल्या वेळी आपण शिवसंपर्क अभियान राबविणार होतो मात्र कोरोना ची लाट आली. त्यांनतर नेमकं माझं माणेच दुखणं उद्बवलं. मात्र आता आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे. येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरलं.

यावेळी त्यांनी एमआयएम सोबत कोणतीही युती होणार नाही, असं स्पष्ट केलं. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले आपल्या सोबत भाजपने युती तोडली. मात्र आता भाजपकडे कोणते मतदार संघ आहेत, हे पाहा. त्यांनी कोणते जिंकले, त्या ठिकाणी तयारी करा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. या मतदारसंघांची सविस्तर यादी मला द्या, असं त्यांनी म्हटलं. तिथं नव्या जोमाचा उमेदवार तयार करा. माझ्याकडे नावं दया, असं ठाकरे म्हणाले.

हे देखील पहा -

तसेच 22 मार्चपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावात जाऊन शिवसेनेची बांधणी करणार आहे. दोन वर्षावर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसैना पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या. शिवसेनेने काही मतदारसंघात पक्ष वाढवणं गरजेचं आहे असे देखील ते म्हणाले.

राज्यात एकामागोमाग एक घटना घडत आहेत. या सर्वांना आपण तोंड देत आहोत. मला एका जागी बसावं लागत आहे. पुण पुढच्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल. शिवसेनेचे विचार गावा गावात पोहचावे गरजेचे आहे. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT