Uddhav Thackeray And Narendra Modi  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोदी सरकार शेतकऱ्यांचा द्वेष करणारे सरकार; ठाकरे गटाच्या खासदाराचा हल्लाबोल

Maharashtra Political News in Marathi: संसदेतील विरोधी पक्षाचे खासदार निलंबित करणे ही मोदींची हुकूमशाही आहे. देशात असं कधीच घडले नाही. केंद्र सरकार प्रत्येक माणसाला लुटण्याचे काम करत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय(बंडू) जाधव यांनी दिली आहे.

भारत नागणे

Maharashtra Political news:

संसदेतील विरोधी पक्षाचे खासदार निलंबित करणे ही मोदींची हुकूमशाही आहे. देशात असं कधीच घडले नाही. केंद्र सरकार प्रत्येक माणसाला लुटण्याचे काम करत आहे. याशिवाय मोदी सरकार शेतकरी द्वेष करणारे सरकार आहे, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय(बंडू) जाधव यांची केंद्र सरकारवर केली आहे. (Latest Marathi News)

शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप शर्मा यांच्या कथेचा कार्यक्रम उद्यापासून पंढरपूरमध्ये होणार आहे. त्याची पाहणी करण्यासाठी खासदार जाधव आले होते. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्यांनी दिल्या घरी सुखी रहा, असा सल्ला खासदार जाधव यांनी दिला. पण आता ते यांच्या चिन्हावर लढतील की भाजपच्या चिन्हावर लढतील बघावं लागेल, असंही ते पुढे म्हणाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संजय जाधव यांची राणे पिता-पुत्रांवर टीकास्त्र

'राणे कुटुंब कशासाठी सारखे पक्ष बदलत आहे.कोणत्या भीती पोटी भाजपात गेले. राणे कोणाबद्दल चांगले बोलतात का. जिनके घर शिशे के वो दुसरे के घर पर पत्थर मारा नही करते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत जिंकेल, असा विश्वास खासदार संजय ( बंडू) जाधव यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'काही जरी स्वच्छ केले तरी गद्दरी शिक्का त्याच्या पाठीवरून जाणार नाही.महाराष्ट्रात चांगलं सरकार नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

रायगडच्या महाडमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला. यावर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'सध्या नीच राजकारण सुरू आहे. काही जण बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चुकीचे बोलले आहेत. महाराष्ट्रात 40 जोकर बोलत फिरत आहेत. बरेच कामांचं उद्घाटन होत नाही, लोकांना यांच्यामुळे त्रासे होतो, अशी टीका ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Screen time kids: वाढता स्क्रीन टाइम मुलांसाठी धोकादायक ठरतोय का? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम

सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित; हा बडा नेता देणार टक्कर?|VIDEO

Crime : शिक्षकी पेशाला काळिमा! गुप्तांगाला हात लावला अन्...; दहावीच्या विद्यार्थावर लैंगिक अत्याचार

Maharashtra Live News Update: कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर भरधाव कारची चार दुचाकींना धडक

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8वा वेतन आयोगाचा निर्णय शेवटच्या टप्प्यात; लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT