अभिजीत देशमुख, साम टीव्ही कल्याण
डोंबिवली एमआयडीसीत फेज-२ मध्ये २३ मे रोजी बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील आज घटनास्थळी भेट दिली आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
या परिसरात छोट्या कंपन्या मोठ्या कंपन्यांनी स्क्रप केलेले रिअॅक्टर वापरतात. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात डोंबिवली एमआयडीसीमधील पाच धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला (Ambadas Danve Visit Dombivli MIDC Blast) होता. मात्र, या सरकारच्या काळात त्यावर काहीच निर्णय झाला नाही अशी अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात डोंबिवलीतील या कंपन्या दुसरीकडे हलवण्याचा निर्णय झाला होता, पण या सरकारने त्यावर काहीच केलं नसल्याचं म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Uddhav Thackeray) यांनी डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांची संघटना "कामा" संघटनेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. यावेळी दानवे यांनी उद्योजकांचे म्हणणे ऐकून घेतले, तर सुरक्षिततेबाबत त्यांना सूचना देखील केल्या आहेत. या ठिकाणाहून अंबादास दानवे यांनी एम हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी झालेल्या रूग्णांची भेट घेतली आहे.
याठिकाणी छिन्नविछिन्न अवस्थेत ( Dombivli MIDC Blast Case) मृतदेह पडलेले दिसत आहे. तर घटनास्थळी रसायनांमुळे मोठी दुर्गंधी देखील पसरली आहे. याप्रकरणी अमूदान कंपनीच्या मालकाविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. आज ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भेट दिली आहे. त्यांनी या दुर्घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.