uddhav thackeray faction morcha at akola collector office tomorrow says mla nitin deshmukh  saam tv
महाराष्ट्र

Mla Nitin Deshmukh News : गावगुंडाविराेधात उबाठा शिवसेना आक्रमक, उद्या अकाेल्यात मूक मोर्चा

या माेर्चात ट्युशन क्लासच्या विद्यार्थ्यांसोबत कॉलेजचेही विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने

Akola News :

अकोला येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आराेप करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी उद्या (मंगळवार, ता. 9) अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. हा माेर्चा उद्धव ठाकरे गटाचे बाळापुरचे आमदार नितीन देशमुख (mla nitin deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार असल्याची माहिती उबाठाच्या शिवसैनिकांनी माध्यमांना दिली. (Maharashtra News)

'नीट अभ्यासक्रमा'साठी शिकायला आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील विशाल धोटे या विद्यार्थ्याची कृषीनगर भागात गुंडांनी भोसकून हत्या केली होती. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ट्युशन असलेल्या भागात विद्यार्थ्यांना गुंडांचा मोठा त्रास असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे.

पाेलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत असल्याने उद्या ट्युशन एरिया असलेल्या न्यु तोष्णीवाल लेआऊट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या माेर्चात ट्युशन क्लासच्या विद्यार्थ्यांसोबत कॉलेजचेही विद्यार्थी सहभागी होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT