Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ आपल्या उरावरी; उद्धव ठाकरेंचा नगरमधून शिंदे सरकारवर घणाघात

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

अभिजीत सोनावणे

Uddhav Thackeray Latest News In marathi:

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. 'सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ आपल्या उरावरी, अशा शब्दात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. (Latest Marathi News)

अहमदनगरमध्ये उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, 'बऱ्याच दिवसानंतर पावसात भिजत दुष्काळी दौरा केला. महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. आता पाऊस आला असला तरी किती प्रश्न सुटेल? पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल. मात्र दुबार पेरणीचं नुकसान कसं भरून निघणार, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला.

'शेतकऱ्यांचे मागील नुकसानीचे पैसे अजून मिळाले नाही. एक रुपयात पीक विम्याचा काय झालं. कांद्याचं काय झालं? दुष्काळाचे पंचनामे कधी करणार? सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ आपल्या उरावरी. जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा यांना मदत करा. दुष्काळ दूर होवो , ही साई चरणी प्रार्थना, असे ते पुढे म्हणाले.

'यांच्याकडे पक्ष फोडायला पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना द्यायला नाही. वीज नियमित येत नाही, वीज बिल मात्र नियमित येतात. आता तुमचं ट्रिपल इंजिन सरकार मागे डबेही लागले आहेत. थोडीजरी नीतिमत्त सरकारमध्ये असेल तर शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा. आम्ही सरकारला जाब विचारणार आहे. दुष्काळ सदृश्य आणि मंत्री, पालकमंत्री अदृश्य आहे, अशी टीका ठाकरेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT