Uddhav Thackeray Latest Speech Saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Latest Speech: होय, मी मतांची भीक मागायला आलोय, पण...'; उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

Uddhav Thackeray Latest Speech: उद्धव ठाकरे यांनी सत्ताधांऱ्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Vishal Gangurde

Uddhav Thackeray News: राज्यातील राजकीय भूकंपानंतर शरद पवारांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी देखील महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यातील एका सभेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधांऱ्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'काही बोगस लोक मी मतांची भीक मागायला आलोय अशी टीका करत आहे. होय, मी मतांची भीक मागायला आलो आहे. पण बोगस सर्टिफिकेट घेऊन मत मागत नाही, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं आहे. (Latest Marathi News)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत आज शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले,आपला पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, मात्र आता राहिलं कोण असं त्यांना वाटत असेल. आता शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. तुम्ही माझ्यासोबत राहिलात, त्यामुळं तुम्हाला देव म्हणावं लागेल'.

'तुम्ही माझ्यासोबत आहे, हे भाग्य खुर्चीत नसलेल्यांना सुद्धा मिळत नाही. मी घरी बसून काम केले, पण घर फोडून नाही केले. तुम्हाला शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यावा लागतोय. तुम्हाला दारोदारी फिरावे लागत आहे, मात्र तुमच्याकडे कोणी फिरकत नाही,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

'सत्ताधाऱ्यांना कामच करायचे नाही, फक्त फोडाफोडी करायची आहे. सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून माझे नाव होते. मात्र जगाचे सर्वोत्तम पंतप्रधान असताना देखील तुम्हाला फोडाफोडी का करावी लागते. जगातील सर्वात मोठ्या पक्षावर अशी वेळ का आली? अशीही टीका ठाकरेंनी केली.

'भाजपला सत्तेची मस्ती आली, मात्र जिंकून येण्याचा विश्वास नाही. सरकारी यंत्रणा बाजूला ठेवून लढून दाखवा. तुम्ही आम्हाला संपवायला लागला आहात, ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केले, त्या पक्षाला तुम्ही संपवायला लागला आहात. हे घरभेदी आहेत, घरफोडे आहेत, तुम्ही आमच्या कुटुंबावर बोलणार, मग आम्ही तुमच्या कुटुंबावर बोलायचे नाही का, असाही सवाल ठाकरे यांनी केला.

'70 हजार कोटी रुपयांचे आरोप असलेले मांडीला मांडी लावून बसले आहेत. ही मंडळी गोमूत्र शिपंडून शुद्ध झाले का? पीएम केअर घोटाळा बाहेर आला पाहिजे,असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

मामाच्या मुलीशी लग्नावर बंदी येणार? नातेवाइकांमधील विवाह रोखण्यासाठी नवा कायदा?

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये बेशिस्त वाहतुकीचा फटका; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

ते एक वर्षभरापूर्वीचं वक्तव्य अन् सोने-चांदीचा भाव गडगडला; PM नरेंद्र मोदींनी सांगितलं नेमकं कारण

बारामतीत गोळीबाराचा थरार! आलिशान कारमधून आलेल्या उद्योजकावर धडाधड गोळ्या झाडल्या

SCROLL FOR NEXT