Nitin Gadkari on Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari on Uddhav Thackeray : 'फडणवीस नागपूरला कलंक', उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गडकरी संतापले; म्हणाले...

'फडणवीस नागपूरला कलंक', उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गडकरी संतापले; म्हणाले...

Satish Kengar

Nitin Gadkari on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. फडणवीस यांचययावर हल्लाबोल करताना ते म्हणाले आहेत की, 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला कलंक आहेत.' त्यांच्या या टीकेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे संपातले आहेत. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा, असं उद्धव ठाकरेंना उद्देशून ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले गडकरी?

नितीन गडकरी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ''उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा.''

ते म्हणाले, ''आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही.'' (Latest Marathi News)

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

नागपूर येथे सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणले होते की, ''फडणवीसांची हालत सध्या अशी विचित्र झालेली आहे की, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. असा उल्लेख करताना ठाकरेंनी फडणवीसांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी युती शक्य नाही, असं ते म्हणाले होते. यावर "अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा", असा ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत त्यांना उत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी कलंकीचा काविळ असा मथला देताना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेल्या ठाकरेंना आठ वाक्यांतून निशाणा साधला आहे. तसेच यापूर्वी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केलेल्या टीकांच्या व्हिडीओ क्लीप्स समोर आणल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT