Political tensions rise as BJP leader alleges internal rift and possible cross-voting in Uddhav Thackeray’s camp. saam tv
महाराष्ट्र

ठाकरेंना पराभूत करण्यासाठी एक गट सक्रिय, उबाठा फुटणार; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

Uddhav Thackeray Internal Conflict Cross Voting Maharashtra: उद्धव ठाकरे गटात मतभेद वाढत असल्याचा भाजप नेते नवनाथ बन यांनी दावा केला आहे. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होणार असल्याचेही ते म्हणाले.

Omkar Sonawane

नवनाथ बन यांनी दावा केला की, उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढले तर त्यांच्या गटातच मतभेद उफाळून येऊ शकतात. काही आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता असून, त्यामागे संजय राऊत यांच्या गटाची रणनीती असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागू शकतो. विरोधकांमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येत असल्याचं त्यांनी म्हटलं.

नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे 6 वर्षे विधानपरिषद होती त्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा एकही मुद्दा विधानपरिषदेत मांडला नाही. त्यांची जर विधानपरिषदेतील उपस्थिती बघितली तर ती 50 टक्के सुद्धा नाही. हे पद जनतेचा आवाज उठवण्यासाठी असते ती अडवण्याचे काम उद्धव ठाकरे करणार आहेत का? असा सवाल बन यांनी केला आहे.

मराठीची लिपि माहीत नाही मग संपादक कशाचे?

नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या संपादकीय पात्रतेवर थेट प्रश्न उपस्थित केला. मराठी भाषेचं मूलभूत ज्ञान नसलेला व्यक्ती मराठी दैनिकाचा संपादक म्हणून काम करू शकतो का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. राऊत यांनी ‘सामना’च्या कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्यांनी म्हटलं की, संपादक हा समाजाला दिशा देणारा असतो. परंतु ज्याला भाषेचं भान नाही, तो समाजाला काय दिशा देणार? उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना मुख्य संपादक न करता कार्यकारी संपादक ठेवणं, यामागे हेच कारण असावं, असा टोला त्यांनी लगावला.

भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन होणार नाही”

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात मराठी भाषा शिकणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाने स्थानिक भाषेचा आदर केला पाहिजे. मात्र मराठीच्या नावाखाली धमकावणं, मारहाण करणं किंवा दहशत निर्माण करणं अजिबात सहन केलं जाणार नाही. भाषा ही संवादाचं माध्यम आहे, संघर्षाचं नाही, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. गुजरात, कर्नाटक किंवा उत्तर भारतातही स्थानिक भाषा महत्त्वाची असते, पण तिथे कुणालाही मारहाण करून भाषा शिकवली जात नाही. महाराष्ट्रात उद्योग, रोजगार किंवा व्यवसायासाठी येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकावी, ही अपेक्षा आहे; मात्र त्यासाठी कायदेशीर आणि सकारात्मक मार्गाने प्रयत्न व्हायला हवेत, असं नवनाथ बन यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळात वंचितच्या 14 आंदोलकांवर गुन्हे दाखल

Monsoon Saree Collection : स्टायलिश अन् कम्फर्टेबल! पावसाळ्यातही नेसा सुंदर साड्या, 'हे' लेटेस्ट कलेक्शन एकदा नक्की पाहा

Veen Doghantali Hi Tutena : घट्ट मिठी, गालावर किस; समर-स्वानंदीच्या नात्यात रोमँटिक केमिस्ट्री सुरू, पाहा VIDEO

Earthquake : नाशिक पुन्हा भूकंपाने हादरले, मध्यरात्री २ तालुक्यात जमीन थरथरली अन्...; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Fatty Liver : लिव्हर खराब झाल्यास काय खावे? डॉक्टरांनी दिली सर्वात महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT