Uddhav Thackeray Latest News Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार नाहीत; २२ जानेवारीला नाशिकमध्ये भव्य कार्यक्रमांचं आयोजन, काळाराम मंदिरात घेणार दर्शन

Uddhav Thackeray: 22 जानेवारीला या मंदिराच्या प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता. राम आमचा सुद्धा आहे माझा सुद्धा आहे, हे सांगण्यासाठी त्यांना हा संघर्ष करावा लागला होता.

Ruchika Jadhav

Ram Mandir Ayodhya:

राम मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देश विदेशातील अनेक प्रतिष्ठितांना निमंत्रित करण्यात आलंय. निमंत्रणाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये चांगलाच वाद रंगलाय. अशात आयोद्धेतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव ठाकरे उप्सिथ राहणार नसल्याची माहिती समोर आलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम हा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. याला राजकीय रंग येऊ नयेत, आम्हाला देखील ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही रामाच्या दर्शनाला जाऊ मात्र तोपर्यंत मानपाण्याचा कार्यक्रम बाजूला ठेवायला हवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच आपण २२ जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पंचवीस वर्ष ज्याच्यासाठी इतका संघर्ष करावा लागला त्या राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. नाशिकमध्ये देखील एक रामाचं मंदिर आहे. 22 जानेवारीला या मंदिराच्या प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता. राम आमचा सुद्धा आहे, माझा सुद्धा आहे, हे सांगण्यासाठी त्यांना हा संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे या काळाराम मंदिरात जाऊन आम्ही रामाचं दर्शन घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

उद्धव ठाकरेंचे अन्य कार्यक्रम

23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे 23 जानेवारीला नाशिक येथे शिवसेनेचे शिबिर होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदानात शिवसेनेची जाहीर सभा देखील होणार आहे, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

प्रभू रामचंद्र काहीकाळ पंचवटीला देखील वास्तव्यास होते, त्या गोदातीरी आम्ही महाआरती करणार आहोत. 22 जानेवारीला अयोध्येला कोण जाणार कोण येणार यात मला पडायचं नाही. कारण तो दिवस आम्हाला अभिमानाचा अस्मितेचा दिवस आहे, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची निवड

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

SCROLL FOR NEXT