Thackeray brothers seen together in identical attire, sparking buzz over alliance and Diwali-time political twists. saam tv
महाराष्ट्र

Uddhav and Raj Thackeray: आयोगाविरोधातील लढाईत ठाकरेच केंद्रस्थानी; दिवाळीआधीच युतीचा बार उडण्याची शक्यता?

Uddhav and Raj Thackeray Yuti: दिवाळीआधीच ठाकरे बंधूंच्या युतीचा बार उडण्याची शक्यता आहे..कारण ठाकरे बंधूंनी तसे संकेत दिलेत आणि तेसुद्धा फक्त बोलण्यातूनच नाही तर वागण्यातूनही मात्र हे संकेत नेमके कसे दिलेत आणि दिवाळीआधी युतीचा बार कसा उडू शकतो? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने राजकीय खळबळ.

  • निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांची एकी, ठाकरे बंधू केंद्रस्थानी होते.

  • दिवाळीआधी ठाकरे युतीचा बार उडण्याची शक्यता

निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांनी एकीची वज्रमूठ आवळलीय. मात्र या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत ते म्हणजे ठाकरे बंधू. होय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. ही दृश्य पाहा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीआधीच विरोधी पक्षाचे नेते शिवालयात एकत्र आले आणि येथेच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते ठाकरेंच्या कपड्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकाच रंगाचे कपडे घातले होते. एवढंच नाही तर शिवालय ते मंत्रालय हा प्रवासही ठाकरे बंधूंनी एकाच गाडीतून केला.

एवढंच नाही तर निवडणूक आयोगाला खिंडीत गाठण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शेजारी शेजारीच बसले आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. सलग दुसऱ्या दिवशीही ठाकरे बंधू निवडणुक आयोगाच्या बैठकीसाठी एकत्र आले. मात्र आता फक्त सिनियर ठाकरेच नाही तर ज्युनियर ठाकरे म्हणजेच आदित्य आणि अमित ठाकरेंही या बैठकीला सोबत आले. विशेष म्हणजे आजूबाजूला बसलेल्या दोघांचा संवाद सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

खरंतर ठाकरे फक्त राजकीय आखाड्यातच एकत्र आलेत असं नाही. तर त्यांच्या कुटुंबांचंही घट्ट मनोमिलन झाल्याचं दिसतंय. राज ठाकरेंच्या संकल्पनेतून साजरा करण्यात येत असलेल्या मनसेच्या यंदाच्या दिपोत्सवाचं उद्घाटनही उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणूकांच्या समीकरण जुळवण्यासाठी ठाकरे दिवाळीआधीच युतीच्या घोषणेचा बार उडवणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Human Body Fact: हृदय शरीराच्या कोणत्या बाजूला असते?

Sillod Nagar Parishad : सिल्लोड नगरपालिका मतदार यादी वादात; अनेक मतदारांची नावे अन्य वॉर्डात गेल्याचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चालवला ट्रक पाहा VIDEO

Bile duct cancer: पित्तवाहिन्यांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत; वेळीच निदान वाचवेल तुमचा जीव

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT