Udayanraje Bhosale, Sanjay Raut saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News: उदयनराजेंना बालेकिल्ल्यात संजय राऊत प्रत्युत्तर देणार ?

Udayanraje Bhosale comment on Sanjay Raut : उदयनराजे हे क-हाड दाै-यावर हाेते.

संभाजी थोरात

Karad News : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरशा समोर उभं राहावं म्हणजे त्यांना उत्तर आपोआप मिळेल असा टोला खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राऊतांना लगावला आहे. क-हाड (Karad) दाै-यावर आले असता त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिले. (Satara Latest Marathi News)

खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून त्यांना विराेधकांनी घेरलं आहे. अधिवेशन काळात राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ सुरू आहे. राऊत यांनी बुधवारी विधीमंडळाला चोरमंडळ असे संबोधले. या वक्तव्यावर राऊत आजही ठाम राहिले आहेत.

याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांना माध्यमांनी छेडले असता त्यांनी राऊतांचा नामोल्लेख टाळत टीका केली. उदयनराजे म्हणाले ज्यांनी कोणी हे वक्तव्य केले आहे. त्यांचे नावही मी घेत नाही. मात्र त्यांनी स्वतःला आरशात पहावे. आरसा प्रत्येकाला आपले खरे रूप दाखवतो असेही राजेंनी नमूद केले.

राजे म्हणाले ज्यांनी वक्तव्य केले त्यांना आरशात पाहायल्यावर समजेल की विधीमंडळ की चोरमंडळ याचा अर्थ. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिना निमित्त बुधवारी क-हाडला बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी उदयनराजे क-हाडात आले हाेते.

दरम्यान उदयनराजेंच्या टीकेवर आता संजय राऊत हे त्यांच्या येत्या दाेन दिवसाच्या सातारा दाै-यात काय बाेलतात याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहणार हे निश्चित.

(Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT