satara, kass encroachment, udayanraje bhosale, shivendrasinhraje bhosale, kass saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : पाडा त्यांचे बांधकाम ! 'कास' अतिक्रमणावरुन उदयनराजेही भडकले

या भागातील मिळकतधारकांना प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. आता दोन्ही राजांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कास बाबत प्रशासन काय निर्णय घेणार हे आता पहावे लागणार आहे.

ओंकार कदम

Udayanraje Bhosale On Kass Encroachment : कासचा (kass) निसर्ग वाचला पाहिजे आणि स्थानिकांची बांधकामे नियमित करून द्यावी मात्र मोठ मोठ्या धनिकांनी (चुकीच्या पद्धतीने) केलेली बांधकामे काढली जावी असा पवित्रा खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी घेतला आहे. कास परिसरातील सुमारे 124 मिळकतधारकांना प्रशासनाने अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल नाेटीसा बजावल्या आहेत. त्यावर खासदार उदयनराजेंनी जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेतल्यानंतर सातारा येथे माध्यमांपुढं भूमिका स्पष्ट केली.

साताऱ्यातील कास हा भाग म्हणजे पर्यटकांसाठी एक पृथ्वी वरील स्वर्गाचा अनुभव. जेव्हा पासून या भागातील सौंदर्य पाहायला पर्यटकांची पावल वळू लागली तेव्हा पासून येथील स्थानिकांनी आणि इतर ही काही लोकांनी हॉटेल व्यवसाय सुरू केले. परंतु आता या भागातील अनधिकृत बांधकामावरून प्रशासन, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक असा जोरदार संघर्ष सुरू झाला आहे.

स्थानिकांना अभय द्या, धनिकांचे बांधकाम पाडा

आता यामध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनीही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली. कासच्या अनाधिकृत बांधकामाबाबत चर्चा केली. याबाबत खासदार उदयनराजे यांनी मात्र कासचा निसर्ग वाचला पाहिजे आणि स्थानिकांची बांधकामे नियमित करून द्यावी मात्र मोठ मोठ्या धनिकांनी (चुकीच्या पद्धतीने) केलेली बांधकामे काढली जावी असा पवित्रा घेतला आहे.

सर्व बांधकमे नियमीत करा

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी कास भागातील सर्व बांधकामे सरसकट नियमित करून द्यावी अशी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशासन जर जेसीबी घेवून आले तर आम्ही त्याला विरोध करणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले. घर पाडायला आले तर प्रशासनाकडे आम्ही काय बघत बसणार नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra News Live Update: आळंदी येथे पीएमपीएमएलच्या बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

'पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका'; मोदीचं आवाहन, सराफा व्यापारी अडचणीत, VIDEO

राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात वाढ, पगार किती वाढणार?

'तुम तो ठहरे परदेसी' गाण्याचे गीतकार झहीर आलम यांचे निधन; ३ हजार रुपयांमध्ये लिहिलं होतं लोकप्रिय गाणं

SCROLL FOR NEXT