udayanraje bhosale shivendraraje bhosale 
महाराष्ट्र

...तर शिवेंद्रराजेंना गाठणार : उदयनराजे

ओंकार कदम

सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली असून जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भात भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. या वेळी उदयनराजेंना शिवेंद्रराजेंच्या प्रश्नावर पत्रकारांनी छेडलं असता शिवेंद्रराजेंची भेट झाली नाही तरी त्यांना गाठणारच असं वक्तव्य त्यांनी केले आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भुमिका या निवडणुकीत महत्वाची असल्यामुळे उदयनराजेंच्या या वक्तव्याला खुप महत्व प्राप्त झालं आहे. shivendraraje bhosale udayanraje bhosale shambhuraj desai satara political news dcc bank election

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकारण तपालं आहे. खासदार उदयनराजे भाेसले यांनी बॅंकेच्या काराभारावर गेल्या काही दिवसांपासून नाराजी व्यक्त केली आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधा-यांनी त्यांना सध्या तरी सर्व समावेशक पॅनलमध्ये घेतलेले नाही.

अर्ज भरल्यानंतर उदयनराजे यांनी मतदारांच्या आणि प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. साेमवारी राजेंनी फलटण आणि कराड दाैरा केला. या दाै-यात उदयनराजेंनी ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत काही विषयांवर चर्चा केली.

आजही उदयनराजेंनी सकाळपासून भेटी गाठींवर जाेर धरला आहे. आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील यांची उदयनराजेंनी भेट घेतली. त्यानंतर उदयनराजेंनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंची भेट घेतली. तेथे त्यांना शिवेंद्रसिंहराजेंना भेटणार का असे विचारले असताना ते भेटले नाही तर गाठणार असे नमूद केले. दरम्यान त्यापुर्वी उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी उभारलेल्या राजधानी सातारा या सेल्फी पाॅईंटच्या लाेकापर्णापुर्वीच तेथे जाऊन सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Maharashtra News Live Update: आत्तापर्यंत महायुती सरकारने मदत केली आहे, जस संकट येईल तशी मदत करणार - मंत्री भरत गोगावले

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT